श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ ; मतदारसंघ कॉंग्रेससाठी सोडण्याची मागणी

म्हसळा: निकेश कोकचा 

काँग्रेसची भूमिका श्रीवर्धन मध्ये राष्ट्रवादीसाठी अडचण निर्माण करू शकते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम न करण्याचा निर्णय श्रीवर्धन मतदारसंघातील काँग्रेसच्या मेळाव्यात घेण्यात आला आहे.

श्रीवर्धन मध्ये राष्ट्रवादीचा विजयरथ रोखण्यासाठी आता मित्रपक्ष काँग्रेस पुढे सरसावला आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ कॉंग्रेस पक्षाला न सोडल्यास पक्षात मोठी बंडखोरी करू पण मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचा निर्धार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. श्रीवर्धन मतदार संघातील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह पाच तालुक्याच्या अध्यक्षांनी म्हसळा येथे झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात हा निर्धार केला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळे खासदार सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदार संघातून त्या संभाव्य उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या या उमेदवारीला आघाडीतील मित्रपक्ष कॉंग्रेसच्या नेत्यांनी ब्रेक लावला आहे. म्हसळा येथे झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह या मतदार संघात येणाऱ्या पाच तालुक्यातील अध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवाराचा विरोध केला आहे. श्रीवर्धन मतदारसंघ हा आघाडीतून कॉंग्रेससाठी सोडण्याची मागणी या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. जर यावेळी वरिष्ठांनी कॉंग्रेस पक्षाला हा मतदारसंघ राखीव ठेवला नाही तर बंड करून अपक्ष उमेदवार देऊ असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी या मेळाव्यात संगितले. काँग्रेसच्या या भूमिकेचा सुनील तटकरे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. श्रीवर्धन मध्ये घराणेशाहीचा आरोप करताना राज्यात आणि देशातील काँग्रेसच्या घराणेशाहीचा विसर कसा पडतो असा थेट सवाल सुनील तटकरे यांनी केला . रायगड मधील सात पैकी दोन मतदारसंघात अस्तित्व असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच्या या ईश्वराकडे कसे पाहतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत