श्रीवर्धन मध्ये प्रशांत शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी, ता 8 रोजी कुणबी सभागृहात शक्तिप्रदर्शन केले. शिंदे काही महिन्यांपूर्वी च सेने मधून भाजप मध्ये पक्षप्रवेश केला. प्रशांत शिंदे समर्थक मित्रमंडळीनी  बुधवारी एकत्र येऊन वाढदिवस साजरा केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी श्रीवर्धन विधान सभा विस्तारक पंकज शहा उप नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक भाजप श्रीवर्धन चिटणीस मंगेश शिंगवण,संचालक वैभव शेटये,सरपंच रमेश घरत शाम नाक्ती जावेद डागू मुक्तार सोडे,दुर्वेश शिंदे, रा.कॉ.महिला अध्यक्ष रुतुजा भोसले शिवसेना माजी महिला संघटक सौ. वाड म्याडम पुजा प्रशांत शिंदे  यांसह अनेक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदेंनी केलेल्या भाषणात कार्यकर्त्यांना पुढे करत समाजसेवक बनून काम करण्याचा निश्चय व्यक्त केला. गेली कित्येक वर्षे शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख राहिले होते.  सध्यस्थीतीतील सेनेच्या तालुक्यातील कार्यकारिणी वर फारकत घेतल्याचे भाषणात सांगितले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांना आपले आदर्श व दैवत मानत असल्याचे सांगितले परंतु माझा वैचारिक राजकारणातली दुश्मनी  शिवसेनेच्या तालुका कमिटीवर असुन त्यांना मी राजकारणामधे कडेलोट केल्या शिवाय गप्प बसणार नाही वाघ जरी जखमी झाला तरी तो जीवाला कंटाळत नसुन तो ती वेल जाऊंदेतो व तेजाने दोन पावले पुढे झेप घेतो. त्यामुळे येथील काहींना प्रश्न पडला होता की प्रशांत शिंदे आता राजकारणातून संन्यास घेणार पण मी राजकारणात सक्रिय  झाल्याने काहीची पाया खालचीवाळू सरकली आहे. सेनेतून बाहेर पडल्यानंतर  प्रशांत शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.  श्रीवर्धन तालुक्यात शैक्षणिक व आरोग्य बाबत विकास होणे गरजेचे आहे. तटकरेंनी विकास कामे केले आसल्याचा आवर्जून त्यांनी यावेळी बोलताना केला.

तटकरेंसमोर आव्हान ?

 श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी पाठोपाठ सेनेचे वर्चस्व आहे. प्रशांत शिंदेंच्या श्रीवर्धन तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजप जर येथे सक्रिय झाला तर राष्ट्रवादीचे आ सुनील तटकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार हे नक्कीच. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत