श्रीवर्धन समुद्रकिनारी काटेरी केंड प्रजातीच्या दुर्मिळ माशाला पर्यटकानांकडून जीवदान

श्रीवर्धन: साहिल रेळेकर

श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत दुर्मीळ समजला जाणारा काटेरी केंड नावाचा विषारी मासा आढळून आलाय. किनाऱ्यावर हा मासा आल्यानंतर तो तडफडत असताना पर्यटकांना आणि स्थानिकांना आढळून आलाय. दरम्यान हा केंड मासा पुन्हा पाण्यात सोडून त्याला जीवनदान दिले आहे.

बुधवारी संध्याकाळी समुद्रकिनारी काही पर्यटक आणि स्थानिक फेरफटका मारायला आले असता त्यांना हा मासा तडफडत असल्याचे दिसून आले. परंतु हा मासा नेहमीपेक्षा वेगळा तसेच दिसायला हिंस्रक असल्याने पुढे जाण्यास आधी कोणी धजावले नाही. परंतु त्या माशाची परिस्थिती अत्यंत बिकट असून तो तडफडत होता त्यामुळे माणुसकीच्या नात्याने हिम्मत करून स्थानिक आणि पर्यटकांनी त्याला समुद्राच्या पाण्यात सोडून जीवदान दिल. हा मासा अत्यंत विषारी असून, त्याचा काटा लागल्यास माणसाला गंभीर इजा होऊ शकते. कारण या माशातून बाहेर पडणारे द्रव हे सायनाईडपेक्षा विषारी असते. तर या काटेरी केंड माशाचे तोंड घुबडासारखे असून याच्या अंगावर काटे असतात. तसेच हा मासा वादळापूर्वी किनाऱ्याजवळ येत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत