संगणक अभियंत्याचा स्वीमिंग टॅंकमध्ये बुडून मृत्यू 

वाकडच्या सिल्व्हर स्पोटर्स क्‍लबमधील घटना 

पिंपरी: रायगड माझा

पोहण्यासाठी गेलेल्या संगणक अभियंता तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वाकडमधील सिल्व्हर स्पोटर्स क्‍लबमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

भार्गव गट्टुपल्ली (वय 24, रा. वाकड) असे मयत तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भार्गव हे कॉगनिझम टेक्‍नॉलॉजी या कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करीत होते. महिनाभरापूर्वी त्यांनी पोहण्यासाठी पर्सनल ट्रेनर लावला होता. दोन दिवसांपूर्वी त्याची मुदत संपल्याने तो स्वतः पोहण्यास शिकत होता. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो पोहण्यासाठी स्वीमिंग टॅंकमध्ये उतरला होता. त्यानंतर त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत