संगत वार्इट असल्यास पालकांनी मुलांचे मित्र व्हावे : शिक्षण महर्षी मुबारक कापडी

रोहे : महादेव सरसंबे 

बदलत्या सामाजिक वातावरणामुळे समाजाची दशा झाली आहे.दशा झालेल्या समाजाला आज ख-या अर्थान दिशा देण्याची काळाची गरज आहे.सोशल मिडीयामुळे तरूणपिढी वाम मार्गावर जात आहे.आपल्या मुलांची संगत वार्इट असल्याने पालकांनी आपल्या मुलांचे मित्र व्हावे व मुलांना जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधावा असे मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण महर्षी मुबारक कापडी यांनी केले आहे.

या वेळी कापडी यांनी आज समाजाची परीस्थिती चिंताजनक आहे.सोशल मिडीयाचा सर्रास गैरवापर होत असल्याने घरातील म़्ुलं आणि तरूण पिढी सोशल मिडीयामुळे बरबाद झाली आहे.दशा झालेल्या पिढीला योग्य दिशाा देण्यासाठी त्यांनी ख-या अर्थाने धर्मग्र्रंथ कुराणचे पठण केले पाहीजे.कुराण शरीफचा अभ्यास केल्यानेच भरकटलेले समाज बांधाव आणि तरूण पिढी यांच्यात बदल होर्इल आणि ते समाजाच्या प्रवाहात ख-या अर्थाने सामिल होतील असा विश्वस विश्वास या वेळी व्यक्त केला.

या वेळी समाज अध्यक्ष अलीम मुमेरे, अ.रहीमान चोगले, मौलाना मसरूल आलम, ज्येष्ठ समाजसेवक अ.समद बंद्री, जाफरखान देशमुख, मौलाना सादीक, ज्येष्ठ पत्रकार हाशम चोगले, इब्राहीम जमादार, अष्टमीचे सचिव इम्तीयाज दर्जी, सहसचिव फार्इक कर्जीकर, अब्बास अली अनवारे, सुलेमान दर्जी, अहमद दर्जी, असिफ कर्जीकर, कादीर रोगे, अखलाक झकोरीया, अ.रशीद मुल्ला, अब्बास कुवारे, मुख्याध्यापक वसीम सातारेकर, रेवा अध्यक्ष रियाज शेटे, विद्यार्थी, पालक आदी मान्यवर व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत