संगमनेर तालुक्यातील ढोरवाडीत भीषण आग…

संगमनेर : रायगड माझा

संगमनेर तालुक्यातील पठारभागातील ढोरवाडी येथे भीषण आग लागून जनावरांचा चारा जळून खाक झाला. तर एका घरालाही आग लागली. सुदैवाने जीवीतहानी टळली. ही घटना गुरूवारी 3 मे दुपारी तीन वाजता घडली. वरूडी पठार परिसरातील ढोरवाडी येथे जालिंदर फटांगरे, भाऊसाहेब गुंजाळ, सखाराम गुंजाळ या शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा साठवून ठेवला होता. गुरूवारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत चारा जळून खाक झाला. गुंजाळ यांच्या घरामागील वाड्यालाही आग लागली. त्यांचाही चारा व काही लाकडे जळाली. तर सखाराम गुंजाळ यांच्याही घराला आग लागली. मात्र अग्नीशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत