संघाची विचारसरणी समजून घेण्यासाठी गेलो होतो असा नितेश राणेंचा खुलासा

कणकवली: महाराष्ट्र News 24 वृत्त 

कणकवली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव पार पडला. या उत्सवात भाजप उमेदवार नितेश राणे सहभागी होते. या उत्सवात सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर लक्ष्य ठरलेल्या नीतेश राणे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. ‘भाजपची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो,’ असा खुलासा त्यांनी केला आहे.

सोशल मीडियावर नीतेश यांचा संघाच्या गणवेषातील फोटो व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर त्यांनी ‘ज्या पक्षात प्रवेश केला आहे, त्यांचे विचार, ध्येयधोरणं समजून घ्यायची होती. यासाठी मी संघाच्या मेळाव्यात सहभागी झालो होतो. जे मला ओळखतात, ते मला ट्रोल करणार नाहीत,’ असं म्हटलं आहे. भाजने नीतेश यांना तिकीट दिलं असलं तरी शिवसेनेनं त्यांच्या विरोधात सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे  नीतेश यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. आता भाजपचे कार्यकर्ते त्यांना साथ देतील का , याबाबत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी नीतेश यांचे प्रयत्न चालले आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते जुळवून घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चर्चा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत