संघाच्या कार्यक्रमासाठी राहुल गांधींना निमंत्रण

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून राहुल गांधी हे आमंत्रण स्वीकारणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

दिल्लीत आरएसएसने सप्टेंबर १७ ते सप्टेंबर १९ या कालावधित ‘भविष्य भारत का’ या विषयावर एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. विविध पक्षाच्या नेत्यांना देखील या कार्यक्रमासाठी बोलवले जाणर असल्याचे, आरएसएसचे प्रवक्ते अरुण कुमार यांनी सांगितले आहे.

राहुल गांधी यांच्या निशाण्यावर आरएसएस कायम राहिले आहे. लंडन विद्यार्थ्यांसमोर बोलताना ‘आमची लढाई ही संघासोबत आहे, जे हिंदुस्थानला वेगळं वळण देण्याच्या प्रयत्नात आहेत. संघ हिंदुस्थानच्या संस्थांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी धडपडत आहे’, असं राहुल गांधी म्हणाले होते. तसेच त्यांनी इसिससोबत संघाशी तुलना केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत