संजय खोडके राष्ट्रवादीत पुन्हा परतणार!

अमरावती : रायगड माझा वृत्त 

 

काँग्रेसचे नेते संजय  संजय खोडके लवकरच स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत. खोडके चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खोडके स्वगृही परततील.

लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे खोडके यांनी पक्ष सोडला होता. अमरावती महापालिकेत खोडके गटाचे वर्चस्व आहे. याठिकाणी पक्षाची रणनीती आखण्यात खोडके यांचा नेहमीच महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. त्यामुळे खोडके यांच्या परत येण्याने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत