संतापजनक ! 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला…

मेरठ : रायगड माझा वृत्त 

संतापजनक आणि चीड आणणारी घटना मेरठमध्ये घडली आहे. एक तीन वर्षांची मुलगी फटाक्यांमुळे गंभीर जखमी झाली आहे. दिवाळीच्या एक दिवसापूर्वी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलानं तिच्या तोंडामध्ये सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो पेटवला, बॉम्ब तोंडात फुटल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मिलक गावातील ही घटना आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मुलीचे वडील शशी कुमार यांना हरपाल नावाच्या युवकाविरोधात तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना हरपालनं तिच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि पेटवला. यात चिमुकलीला गंभीर दुखापत झाली आहे. मुलीला तब्बल 50 टाके पडले आणि घशालाही इजा झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत