संदेरी धरण कालव्याच्या ओढ्यावरील पूल कोसळण्याची शक्यता

पुलाच्या सुरक्षितेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

म्हसळा – निकेश कोकचा 

तालुक्यातील संदेरी येथील असणाऱ्या धरणाच्या कालवा शेजारी ओढ्यावरील असणारा पूल गेली मोडकळीस आलं असल्याने हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी त्यांच्या मंत्री काळात या धरणाची निर्मिती करीत असताना संदेरी धरण शेजारी असणाऱ्या ओढ्यावरील हा पूल त्यावेळी संदेरी मोहल्ला ते संदेरी गाव असा पलीकडे जाण्यासाठी बहुपर्यायी मार्ग होण्यासाठी या पुलाची बांधणी करण्यात आली होती परंतु आजतागायत या पुलाकडे पाटबंधारे विभागाने कोणत्याही प्रकारे लक्ष घातलेलं नसून आता हा पूल आतील काँक्रीट तसेच सल्यांचा भाग निघून कोसळण्याच्या स्थितीत उभा असल्याचं चित्र समोर दिसत आहे. सदर ओढ्यावरील असणाऱ्या पुलावर संदेरी येथील नागरीक सतत ये जा करत असतात त्यामुळे शेतकरी वर्ग या पुलाच्या बाजूला असणाऱ्या शेतीत जाण्यासाठी याच पुलाचा मुख्यत्त्व वापर करीत असतो ,त्यामुळे बऱ्याचश्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन यावरून मार्ग पत्करावा लागत असल्याने घबराटाचे वातावरण संदेरी विभागात निर्माण झाले आहे.
संदेरी धरणाची अवस्था गेली कित्येक वर्षापासून भग्न होत चालली असताना आम्ही संदेरी ग्रामपंचायतीच्या मार्फत वारंवार पाटबंधारे विभागाला याबाबतीत सूचित करून देखील अद्याप कोणत्याच प्रकारची दखल पाटबंधारे विभागाने घेतली नसून धरणावरील असलेल्या ओढ्यावरील सांकवाची देखील दुरवस्था झाली असून कोणत्याही क्षणी हा पूल कोसळू शकतो या परिसरात असलेली पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देखील कोणत्याच प्रकारची हालचाल करताना दिसत नसल्याने ग्रामस्थांमध्ये आता नाराजी व्यक्त होत आहे.(फारुक हजवाने, संदेरी ग्रामपंचायत सरपंच)
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत