संदेरी येथील युवकाचा जोगेश्वरी महामार्गावर अपघाती मृत्यू :खड्यानें घेतला म्हसळा तालुक्यातील तरुणाचा जीव

म्हसळा :प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील संदेरी येथील दिपेश सुनील पवार वय २३ वर्षे या तरुणाचा मुंबई येथील जोगेश्वरी दरम्यान असलेल्या महामार्गावर खड्डा चुकवताना झालेल्या मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दि.१८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. सुरजने काही महिन्यापुर्वीच हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण करून जोगेश्वरी येथिल एका हॉटेलमध्ये नोकरीला लागला होता. नोकरीला जात असताना तो नेहमीप्रमाणे आपली मोटारसायकल घेऊन निघाला.
मात्र जोगेश्वरी येथिल महामार्गावर अचानक रस्त्यामध्ये असलेल्या एका खड्याचा अंदाज न आल्याने सुरजची मोटारसायकल त्या खड्यात आदळून थेट समोर असणाऱ्या एका ट्रकवर जाऊन आदळली. या धडक मध्ये  सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असता,ट्रक चालकाने तातडीने सुरजला दवाखाण्यात नेण्याचा प्रयत्न  केला. परंतु काळापुढे कोणाचेच चालत नसल्याने सुरजचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातामध्ये सुरजचा मृत्यू झाल्याने संपूर्ण संदेरी परिसरात एकच शांतता पसरली.  सुरजच्या मृत्यूला जबाबदार खड्डे की, खड्डे दुर्लक्षित करणार प्रशासन असा प्रश्न या अपघातातून उपस्थित झालेला आहे.अपघातात मरण पावलेला सुरज हा लहानपनापासून मुंबईत राहत असल्याने उच्च शिक्षणाचे ध्येय गाठत त्याने मुंबई येथील नामांकित महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण करून आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरण्याची तयारी सुरु केली होती.परंतु काळाने अशी मध्येच झडप घातल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सुरजच्या पश्चात आई,वडील,एक छोटा भाऊ,आजी, आजोबा असा परिवार आहे .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत