संपर्कप्रमुख दत्ता दळवी शिवसैनिकांच्या संपर्कापासून दूरच; दत्ता दळवी यांच्यावर शिवसैनिक नाराज

कर्जत : विकास मिरगणे (प्रतिनिधी)

रायगडचे संपर्कप्रमुख म्हणून सेनेचे नेते दत्ता दळवी यांच्याकडे कर्जत पनवेल उरण असे तिन्ही विधानसभेची मतदारसंघांची जबाबदारी आहे. मात्र दत्ता दळवी संपर्कप्रमुख झाल्यापासून फारसे या मतदारसंघात फिरताना दिसून येत नाहीत. संपर्कप्रमुख झाल्यापासून पक्षाची संघटना बांधणी करणे गरजेचे होते, तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे दळवी हे रायगडचे संपर्क प्रमुख असून नसल्यासारखे आहेत. असे शिवसैनिकांना वाटत आहे.

या आधीचे संपर्क प्रमुख संजय मोरे असताना ते नेहमीच मतदारसंघात दौरे आणि नियोजन करायचे. मात्र दत्ता दळवी हे संपर्कप्रमुख असून लक्ष्य देताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सध्या, शिवसैनिक आपण यांना पाहिलंत का? असा प्रश्न तीनही मतदारसंघात विचारला जात आहे. तसेच दत्ता दळवी हे संपर्क प्रमुख असून सुद्धा त्यांचे बॅनरवर फोटो दिसत नाही. त्यामुळे सेनेच्या नेत्यांना विसर पडला आहे, तसेच संपर्कप्रमुख दळवी शिवसैनिकांच्या संपर्कपासून दूरच आहे. त्यामुळे नेरळ आणि माथेरान या भागात सत्ता केंद्रासाठी संघर्ष सुरू आहे. दळवी हे पक्ष संघटना म्हणून लक्ष्य देताना दिसून येत नाहीत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत