संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढवणार

रायगड माझा वृत्त | पिंपरी

संभाजी ब्रिगेडने सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक लढा; तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा याबाबत कायम पुढाकार घेतला. ग्रामपातळीवर याविषयी प्रबोधन केले. तसेच जनसामान्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. हे करताना जनसामान्यांच्या प्रश्‍नाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अनेक अडचणी जाणवल्या. त्यामुळे जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, संभाजी ब्रिगेड येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी दिली. चिंचवड येथे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावाप्रसंगी मार्गदर्शन करताना सुधीर देशमुख बोलत होते. मेळाव्याला प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुशे, सुजाता ठुबे आदी उपस्थित होते. यावेऴी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिमन्यू पवार यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यात राजकीय गरज काय व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सुधीर देशमुख यांनी संभाजी ब्रिगेडने गेली पंचवीस वर्ष राज्यभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांना आव्हानांना सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुशे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रविण कदम यांनी केले. आभार जिल्हा उपाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब चांदवडे, सचिव श्रीकांत गोरे, सुरज साळुंके आदींनी परिश्रम घेतले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत