संभाजी भिडें विरोधात संभाजी ब्रिगेडकडून पोलिसांकडे तक्रार

पुणे : रायगड माझा वृत्त 

आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा श्रेष्ठ होता, असे वादग्रस्त विधान श्री शिवप्रतिष्ठान चे संभाजी भिडे यांनी केले होते. या विधानाविरोधात संभाजी ब्रिगेडकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संभाजी भिडें विरोधात संभाजी ब्रिगेडकडून पोलिसांकडे तक्रार

त्यांचे व्हिडीओ तपासण्याचे काम चालू आहे. त्यात तथ्य आढळल्यास भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगतिले. सदर वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी शनिवारी पुण्यात पालखी आगमनापूर्वी धारकयाना संबोधित करताना केले होते. त्यांच्या या विधानाचा पुणे शहरातील संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात विधी मंडळ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे गुरुजींच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेत कारवाई करण्याची मागणी केली. तर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे यांनी केलेले वक्तव्य तपासून ते संविधान विरोधी असल्यास कारवाई करु असे आश्वासन देखील दिले.

त्याच दरम्यान पुण्यातील संभाजी ब्रिगेड संघटनेकडून संभाजी भिडे यांच्यावर अशा विधाना बद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून त्या बाबतचे निवेदन पोलीसांना देखील देण्यात आले आहे. या विषयी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे म्हणाले की,संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीर समर्थन केले असून हे संविधान विरोधी आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना त्यांनी कमी लेखले आहे. यापूर्वी देखील भिडे यांनी अशा प्रकारची विधाने केली असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली.

यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब वागमाळे म्हणाले की, जंगली महाराज मंदिरातील व्हिडीओ आमच्याकडून तपासण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये तथ्य आढळल्यास संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत