संभाजी भिडे पालखी सोहळ्यात सहभागी, वारीत वादाची ठिणगी

पुणे : रायगड माझा वृत्त 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असून या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे गुरुजी सहभागी होणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक पराशर मोने यांनी दिली. आम्हाला कोणीही परवानगी नाकारली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्वयंसेवक सहभागी होतील, असे ते म्हणालेत. दुपारी संभाजी भिडे आणि प्रतिष्ठानचे स्वयंसेवक दोन्ही पालख्याच्या दिंडी मागे सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

गेल्या वर्षी देखील पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यापैकी काहीजणांकडे तलवारीही होत्या. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला.

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे हे आरोपी असून गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली, असे वादग्रस्त विधान केल्याने त्यांना नुकतीच नोटीसही बजावण्यात आली आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत