संयम बाळगण्याचे सुरेश लाड यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

कर्जत (रायगड): अजय गायकवाड

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कर्जत मतदारसंघातील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी सुरेश लाड समर्थनार्थ सोशल मीडियावर मोर्चा उघडला होता. मात्र कार्यकर्त्यांनी याबाबत संयम बाळगावा असे आवाहन माजी आमदार सुरेश लाड यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

कर्जत मतदारसंघात सुरेश लाड यांचा झालेला पराभव राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मतदारसंघातील अनेक नेत्यांनी पक्षाचे काम न केल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. आता सुरेश लाड यांना विधान परिषदेवर संधी दयावी किंवा त्यांचे उचित असे राजकीय पुनर्वसन करण्याची या कार्यकर्त्यांची मागणी आहे. यासाठी या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड उठविली असून त्यातून कोणी नेते सुटले नाहीत. त्यामुळे आता सुरेश लाड यांनीच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

आता सुरेश लाड यांचे खरंच राजकीय पुनर्वसन केले जाते का? त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यावर पक्ष काय कारवाई करतो? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत