संयुक्त राष्ट्र अंमलीपदार्थ आयोगाचा ऐतिहासिक निर्णय; गांजा ड्रग्स नव्हे तर औषध!

नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने बुधवारी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे.

यासाठी २७ देशांचे ऐतिहासिक मतदान घेण्यात आले होते. या मतदानात २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले. तर बाकी देशांनी याविरोधात मतदान केले. तसेच या २७ देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी विरोधात मतदान केले.

“या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत