संविधानामुळेच भारत जगातील सर्वोत्तम देश: फडणवीस

मुंबई : रायगड माझा वृत्त 

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचे विचार आणि त्यांनी दिलेलं संविधान यामुळेच भारत जगातील सर्वोत्तम देश होऊ शकतो. आम्ही त्यांच्या विचारावरच राज्यकारभार चालवत असून बाबासाहेबांचं समतेचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. बाबासाहेबांनी पाहिलेलं समतेचं स्वप्न साकारण्याचं काम आम्ही करत आहोत. शेवटच्या माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजेत यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्या दिशेनं सरकारचं कामही सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले. बाबासाहेबांचं जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत