सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र बंदला सुधागडात उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाली, परळी, पेडली, जांभूळपाडा बाजारपेठेत कडकडीत बंद !

पाली : विनोद भोईर

सकल  मराठा समाजाने महाराष्ट्र बंद हाक दिल्यानंतर त्याचे पडसाद सुधागड तालुक्यातही उमटले असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी २८ वर्षीय तरुणाने केलेल्या आत्महत्येच्या कारणास सरकार जबाबदार असून सरकारच्या निषेधार्थ सुधागड तालुक्यातील तमाम मराठा समाज बांधवानी पाली, परळी, पेडली, जांभूळपाडा येथील मुख्य बाजारपेठेतून मोर्चे काढून घोषणाबाजी करीत सुधागड बंदची हाक दिली. या  बंदला पाली व्यापारी असोसिएशनने सहकार्य करीत आपली दुकाने तात्काळ बंद केली. दि. २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाली येथील मराठा समाज भवन येथे सुधागड तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी जमले होते.त्यानंतर पालीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाली शहरातील मुख्य बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयाकडे ही रॅली काढण्यात आली.

सदर रॅली मध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाज आरक्षणा बाबत सरकारचा नाकर्तेपणा आहे म्हणून सरकारच्या निषेधात घोषणाबाजी करीत पाली परिसर दणाणून सोडला. व शेवटी या रॅलीचे पाली तहसीलदार कार्यालय येथे सभेत रुपांतर होऊन तेथे मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आपल्या मागण्याचे निवेदन पालीचे तहसीलदार बी.एन.निंबाळकर यांना देण्यात आले. यावेळी सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपत सितापराव, गंगाधर जगताप, जीवन साजेकर, धनंजय चोरगे, शरद चोरगे, प्रदीप गोळे, शिरीष सकपाळ, संदीप खरिवले, महेश पोंगडे, सुरेश अंग्रे, नथुराम बेलोसे, विजय धनुर्धरे, विवेक तेलंगे, मंगेश पालांडे, परेश शिदे, संतोष उतेकर, विनोद भोईर, मंगेश यादव, नितीन देसाई, गणेश भोईर, महिला कार्यकर्त्या निहारिका शिर्के, स्नेहा भोईर, आदीसह तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्यासंख्येनी उपस्थित होते. दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत