सख्या भावाकडून मोठ्या बहिणीची हत्या

वसई : रायगड माझा वृत्त 

वसईत सख्या लहान अल्पवयीन भावानेच  मोठ्या बहिणीची गळा आवळून हत्या केली आहे. बहीण मित्रासोबत जास्त राहते, आणि फोनवर जास्तवेळ बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून  हत्या केली असल्याचे उघड झाले आहे.

वसईतील पाळणापाडा येथील दुमडा चाळीत काल २७ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. काजल पगारे असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव असून ती १८ वर्षांची आहे तर हत्या करणारा आरोपी भाऊ हा १७ वर्षांचा आहे. आरोपी विरोधात वालीव पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्या आले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत