सत्ताधारी-विरोधकांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ

पिंपरी : रायगड माझा 

आषाढी वारीतील दिंड्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तु न देण्यावर जवळपास सहमती झालेल्या सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्षमण जगताप यांच्या सुचनेनंतर अखेर नरमले. मात्र, आता या भेटवस्तुवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या कामाचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: चढाओढ लागली आहे. तसेच ही परंपरा आम्ही खंडीत होऊ न दिल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना महापालिकेच्या वतीने यंदा देखील ताडपत्री भेट देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी ताडपत्रीची एका नगाची खरेदी 3200 रुपयांप्रमाणे झाली होती. मात्र, यंदाची ताडपत्रीच्या एका नगाची किंमत 1900 रुपये ठरविण्यात आली आहे. या सर्व खर्च महापालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनातून केला जाणार आहे.

दरम्यान, विरोध पक्षनेते दत्ता साने यांनी आपल्या दालनात या भेटवस्तू खरेदीविषयीची माहिती दिली. याबाबत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना विचारले असता, अशाप्रकारचा निर्णय जाहिर करण्याचा अधिकार विरोध पक्षनेत्यांना नसून, तो सभागृह नेत्याला आहे. साने यांनी केवळ त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या मानधनाविषयी बोलावे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असलेल्या आकुर्डी परिसरात नागरी सुविधांचे नियोजन न झाल्याचा साने यांचा आरोप खोडून काढला. या परिसरात 400 मोबाईल टॉयलेटस्‌ची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय वैद्यकीय, पिण्याच्या पाण्याची व राहण्याची व्यवस्था देखील चोखपणे केल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत