सत्तेचा माज उतरवण्याची ताकद फक्‍त शिवबंधनातच

रायगड माझा वृत्त 

शिवसेना आणि भाजप यांच्यात एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. सत्तेचा माज आला असेल तर तो उतरविण्याची ताकद फक्‍त शिवबंधनात असल्याचे सांगत सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

दरम्यान सावंत यांच्या या वक्‍तव्याने आता दोन्ही पक्षात वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. आज प्रत्येक क्षणाला सावध राहण्याची गरज आहे. आम्ही गाफील राहणार नाही, जर कोणाला सत्तेचा माज आला असेल तर तो उतरवण्याची ताकद फक्‍त शिवबंधनातच आहे, त्यामुळे आम्हाला धमक्‍या देण्याच्या भानगडीत कोणी पडू नये,असे वक्‍तव्य सावंत यांनी केले. तसेच एकला चलो रे किंवा युती करायची कि नाही याचा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील असेही सावंत यांनी म्हटले. सावंत यांच्या या वक्तव्यामुळे युतीमध्ये सारे काही आलबेल आहे असेही नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत