सन्मान खाकीचा… सन्मान कर्तव्यदक्ष पोलिसांचा…

बदलापूर: अरुण बैकर 

गेल्या अनेक दिवसांपासुन बदलापुर परिसरात चोरीच्या आणि फसवणुकीच्या घटना वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धड़क कारवाई केल्याने तंटामुक्ती समिती ढवळे-कुडसावरे यांच्या वतीने बदलापुर ग्रामीण पोलिसांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

तंटामुक्ती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बदलापुर ग्रामीणचे प्रभारी पोलिस अधिकारी संदिप निगडे यांचा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष बैकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राहुल नळकांडे तसेच त्यांचे सर्व सहकारी पोलिस कर्मचारी यांचा देखिल सत्कार करण्यात आला. दरम्यान नोकरीचे अमिष दाखवून वांगणी नजीकच्या ढवळे गावातील तरुण दर्शन खांबाळे याची सोन्याची चैन एका भामट्याने फसवणुक करून लंपास केली होती. या प्रकरणाचा जलद तपास करून ग्रामीण पोलिसांनी दर्शनची सोन्याची चैन मिळवुन दिली. त्याबद्दल सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार आणि कौतुक करण्यात आले. फसवणुकिच्या या प्रकरणात एका आरोपीला अटक करून त्याच्या कडून तब्बल 30 तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची तसेच आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती प्रभारी अधिकारी निगडे यांनी दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य नाना जाधव, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बैकर तसेच परिसरातील तरुण वर्ग, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या या कर्त्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत