समन्वय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी !

दांडी बहादर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार ?

 पाली : विनोद भोईर

सुधागड तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक नुकतीच पाली तहसील कार्यालयाच्या  हिरकणी कक्षेत अध्यक्ष राजेश मपारा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य  तथा सभापती साक्षी दिघे राजेंद्र राउत , अशोक मेहता , किसन उमटे , पंढरीनाथ घोसालकर , निहारिका शिर्के , वारा आरती भातखंडे , तहसीलदार बी.एन .निबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सदर बैठीत कृषीपंचायत समितीवनेआरोग्य जी. प. बांधकाम, सा.बा.विभाग, एमएसआरडीसी, सामाजिक वनीकरणभूमिअभिलेखपोलीस, पुरवठामहसूलपरिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र आरोग्य, पाणीपुरवठा, बीएसएनएल, आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करून सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विधानपरिषदेवर नव्याने निवडून आलेले आमदार निरंजन डावखरे, जयंत पाटील, अनिकेत तटकरे त्याच प्रमाणे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांना शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या पुरस्काराबद्दल या चारही मान्यवरांच्या अभिनंदनांचा ठराव करण्यात आला.

 

सुधागड तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्या बाबत तसेच तालुक्यात सुमारे ३८०० नादुरुस्त असणारे वीज मीटर, नव्याने बसविण्यात येणारे ट्रान्सफार्मे यात होणारे बिघाड,भरमसाठ येणारे वीज बिल आदी समस्यां बाबत अध्यक्षांनी महावितरणचे उपअभियंता गोयने यांचे या समस्यां बाबत निराकरण करतांना थातूरमातूर उत्तरे तेद सपशेल भंबेरी उडाली ! त्याच प्रमाणे शिक्षण विभागातील योजनांची माहिती देतांना गटशिक्षणाधिकारी कुलकर्णी हे अर्धवट माहिती देत असल्याचा आरोप समन्वय समितीचे सदस्य राजेद्र राउत यांनी केला. तसेच तालुक्यात असणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थामध्ये शिक्षणाचा मांडलेला बाजारीकरण यावर अंकुश ठेवण्यात गटशिक्षणाधिकारी कुलकर्णी हे कुचकामी ठरत असल्याचा ठपका सदस्य घोसाळकर यांनी ठेवला. कृषी खात्याच्या प्रश्नावर चर्चा करतांना शेतकर्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम जमा झाल्या बाबत शेतकरी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यास गेल असता शेतकरयांना आपली रक्कम  बँकेत जमा झाल्याचे सागितले जाते परंतु प्रत्येक्षात बँकेत रक्कम जमा नसते शेतकऱ्याला कृषी कार्यालय ते बँक असे हेलपाटे मारून त्रास सहन करावा लागत असल्याने यापुढे असा प्रकार होऊ नये याची दक्षता कृषी खात्याने घ्यावी असे अध्यक्षासह सदस्यानी कृषी अधिकारी यांना सूचित केले . पाली बस स्थांनकाची गभीर समस्या असून त्याकडे एस टी महामंडळच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली असून ही इमारत पडून अपघात झाल्यानंतर अधिकारी लक्ष देतील का ? असा संताप या बैठकीत व्यक्त करण्यात आला आणि एस.टी महामंडळचा प्रतिनिधी या बैठीत हजर नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली . सदर बैठक सुरु होण्याअगोदर या समितीचे सचिव तथा तहसीलदार निंबाळकर यांनी अध्यक्षासह सर्व सदस्याचे स्वागत केले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत