समलैंगिक शरीर संबंधास नकार देणाऱ्या पुरुषांवर वार

पिंपरी  : रायगड माझा

शरीर संबंधास नकार देणाऱ्या पुरुषावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री हिंजवडी येथे घडली.
हरिश रमेश कुकरेजा (रा. लकी बेकरीसमोर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दत्तनगर चिंचवड येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरूणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी तरुण व आरोपी कुकरेजा हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
कुकरेजा व फिर्यादी सोमवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर ङमहामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून चालले होते. ते बिटकॉइन कंपनीसमोर आले असता त्यावेळी आरोपी कुकरेजा यांनी फिर्यादी तरूणाकडे शरीर संबंधांची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या कुकरेजा याने धारदार चाकूने फिर्यादी तरुणाचा डाव्या हातावर वार करून जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत