समाजातील सर्वच घटक भाजप सरकारवर नाराज – राष्ट्रवादी काँग्रेस

गडचिरोली: रायगड माझा वृत्त

पुढील वर्षी राज्यात निवडणुका होणार आहेत. २०१४ साली काही मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी सर्वत्र मोदी लाट होती पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही, असे गडचिरोलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

२०१९ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या विदर्भ दौऱ्यावर असून “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम, अधिकाधिक लोकाभिमुख व्हायला हवा, हा ‘राष्ट्रवादी कनेक्ट’ दौऱ्यामागचा हेतू आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी येत्या काळात बुथ कमिट्या तयार कराव्यात. बुथचे सदस्य हे त्यांच्या बुथच्या लोकांसाठी काम करतील”,असे त्यांनी आयोजित बैठकीत संबोधित केले.

महिला, युवक, दलित, अल्पसंख्याक, असे सर्वच घटक या सरकारवर नाराज आहेत. भाजपला या नाराजीचा फटका निवडणुकीत नक्कीच बसेल पण कार्यकर्त्यांनी सरकारच्या चूका लोकांच्या समोर आणायला हव्या, असे आवाहनही माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.