सरकारकडून माझे आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत : राजू शेट्टींचा गंभीर आरोप

My phone call are taped by the government : MLA Raju Shetty | सरकारकडून माझे आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत : राजू शेट्टींचा गंभीर आरोप

पुणे : रायगड माझा वूत्त

सरकारकडून माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत असा गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना  सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीच्या रकमेसाठी आक्रमक झाली असून खासदार शेट्टी मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकारवरही टीका करत आहेत. मात्र पुण्यात त्यांनी त्यांचे व कार्यकर्त्यांचे मोबाईलवरून संभाषण सुरु असताना फोन टॅप होत  असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ते म्हणाले की, माझे आणि ज्या कार्यकर्त्यांचे फोन झाले त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे ही आमच्या मूलभूत हक्कांवर गदा  आहे असेही ते म्हणाले.

खासदार असलेल्या शेट्टी यांनी थेट सरकारवर हा आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आरोपांना भाजपकडून काय उत्तर मिळते हेच भविष्यात बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत