राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जात असून आज झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद व नगरपालिका कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

समन्वय समितीच्या बैठकीनंतर सरकारी कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर ठाम आहेत आणि उद्यापासून (७ ऑगस्ट) आम्ही संपावर जात आहोत, अशी घोषणा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मंत्रालयाच्या आरसा गेटवर आंदोलन करण्यात येणार असून संपादरम्यान मंत्रालयाच्या तिनही प्रवेशद्वारांना टाळे लावण्याचा इशारा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद देशमुख आणि नंदू काटकर यांनी दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.