सरकार फार काळ टिकणार नाही; राज ठाकरेंचा इशारा 

महाराष्ट्र News 24 वृत्त

सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. सरकारच्या स्थिरतेविषयी वेगवेगळी मत व्यक्त केली जात असताना त्यात ता राज ठाकरेंनी सरकारला धोक्याचा इशारा दिला आहे. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असं वाटत नाही, असं भाकीत मनसेचे राज ठाकरे यांनी वर्तवलं आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षाचं सरकार आलं होतं. तेव्हाच मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही असं वाटतं. या सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार लवकर जाईल, असं वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले. एका  वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवलं. मनसे अधिकृत या ट्विटर हॅण्डल वर देखील याबाबतचं  ट्विट करण्यात आले आहे.

 माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असेल हे मी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडून सांगितलं आहे. माझ्या हातात सत्ता आल्यावरच महाराष्ट्र कसा असावा ते दाखवता येईल. त्याशिवाय महाराष्ट्र कसा घडवता येईल? जगाला हेवा वाटणं हे माझं स्वप्न आहे. त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यायला हवा, असं सांगतानाच मला जे वाटतं ते आताच्या सरकारमधील लोकांना सांगून काय उपयोग. ते त्यांच्या पद्धतीने सत्ता राबवत आहेत. माझ्या मतानुसार त्यांनी काही करावं, अशी अपेक्षा करणं बरोबर नाही, असंही राज ठाकरे  म्हणाले.

राज ठाकरेंची भूमिका पाहता विरोधकांना  नेटाने तोंड द्यायची तयारी सरकारला करावी लागणार हे मात्र नक्की.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत