सरकार विरोधात रस्त्यावर संघर्ष करा; राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

कर्जत: अजय गायकवाड 

बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराने कळस गाठला असल्याचे सांगत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख सरकारविरोधात तोंडसुख घेतले. कर्जत येथे आयोजित रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सध्या महाराष्ट्रभर झंझावात सुरु आहे. विविध आंदोलने आणि पक्ष बैठकांतून ते संघटना बांधणीचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आज रायगड जिल्ह्यातील युवक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली . कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित आढावा बैठकीसाठी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रायगड जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, रेहान देशमुख उपस्थित होते. सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने सामान्य माणसाचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी आणि युवकांची तर पूर्णपणे फसवणूक या सरकारने केली असून या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या आढावा बैठकीत जे पदाधिकारी निष्क्रिय असतील त्यांना बदलून नव्यांना संधी देण्याची सूचना त्यांनी जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांना केली. आगामी काळात पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपला बूथ सक्षम केला पाहिजे असे सांगून युवकांना एनसीपी युथ कनेक्ट अँप बरोबर जोडले जाण्याचे आवाहन त्यांनी केले. आता प्रदेशाध्यक्षांच्या आवाहनानंतर रायगड मधील राष्ट्रवादी युवक संघटना कितपत प्रभावी होते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत