” सरनाईकांनी माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावाच”, किरीट सोमय्या

महाराष्ट्र News 24

“प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच” असं म्हणत सोमय्यांनी आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “शिवसेना प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील” असं म्हटलं आहे. तसेच “एक रुपयांचाही दावा ते माझ्याविरोधात दाखल करू शकत नाहीत. सरनाईक यांनी आधी जनतेच्या फसवणुकीचा जाब द्यावा” असं देखील याआधी म्हटलं आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांचा एनएसईएलचा २५० कोटी रुपयांचा घोटाळा यापूर्वी बाहेर आला होता. त्या पैशांतून त्यांनी कल्याण तालुक्यातील गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांवर ईडीची जप्ती आली असताना हे व्यवहार पुढे सुरूच आहेत, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांना एक खुलं आव्हान दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही ठाण्यात कोणत्याही प्रकारची अनाधिकृत इमारत बांधलेली नाही. विहंग गार्डन या इमारतींची तक्रार केलेली चुकीची असून मी या शहराचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करतांना, अनाधिकृतरित्या केलेले नाही आणि करणार ही नाही. असे सांगतांनाच किरीट सोमय्या यांनी जे काही बदनामी केलेली आहे, त्याच्याविरोधात आता थेट न्यायालयात १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा ठोकणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विहंग गार्डनच्या बाबतीत ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशी म्हणण्याची वेळ आता सोमय्या यांच्यावर आल्याची टीकाही त्यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत