सरपंचाच्या खुर्चीवर छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेऊन ग्रामविकास चळवळीने स्वीकारला कार्यभार

पेण : मनोज पाटील

आज शिर्की ग्राम पंचायत निवडणुकीत चळवळीचा एकतर्फी विजय झालाय. सरपंचाच्या खुर्चीत पुढील पाच वर्ष सरपंच न बसता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे.

व्हावे सकल जनाचे हित, हेच चळवळीचे धोरण! हि चळवळ खारेपाट विभागामध्ये पाणी प्रश्न तसेच रस्ते आणि इतर गोष्टींवर काम करते. मागच्या महिन्यात झालेल्या शिर्की ग्रामपंच्यायत निवडणुकीमध्ये ग्राम विकास चळवळिला जनतेने भरभरुन मतदान करून ग्रामविकास चळवळिला निवडून दिले. ही चळवळ जनतेच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम करते, गेली कित्येक वर्ष या विभागामध्ये विकास कामे झालेली दिसून येत नाहीत त्यामुळे कुठेतरी आपण ही चळवळ करुन जनतेला न्याय देऊ शकु असे या चळवळिचे मत आहे.

जनतेने निवडून दिलेल्या सरपंचाने खुर्चीची अपेक्ष्या न बालगता, आपल्या खुर्चीवर न बसता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा खुर्चीवर ठेऊन येणारी ५ वर्ष ही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कारभार चालऊ असे चळवळी ने आपले मत व्यक्त केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत