सरोगसी प्रकरणात चार डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा नोंद,दोघांना अटक

नागपूर : रायगड माझा वृत्त 

आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बनविल्यानंतर त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी ४ डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली.

डॉ. चैतन्य शेंबेकर (देवनगर), डॉ. लक्ष्मी श्रीखंडे (धंतोली), डॉ. दर्शना पवार (रविनगर चौक), डॉ. वर्षा ढवळे (छत्रपती चौक), मनीष सुरजरतन मुंदडा (३१) आणि हर्षा मनीष मुंदडा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी मुंदडा दाम्पत्याला अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ज्यांना मुले होत नाहीत अशा दाम्पत्यांसोबत संपर्क करून मुंदडा दाम्पत्य हे त्यांना अपत्य सुखाचे आमिष दाखवीत होते. यासाठी अपत्यहीन दाम्पत्याकडून ते लाखो रुपये घेत असत. सरोगसी मदरसाठी ते गोरगरीब आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना हेरायचे. या गोरगरीब महिलांना सरोगसी मदर होण्यासाठी त्यांना लाखो रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते. कुणाला अडीच ते कुणाला चार पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत