सर्पमित्राचा सर्प दंशाने मृत्यू

शहापूर: विजय पिलकर

शहापूर तालुक्यातील करंज पाडा येथील एका सर्पमित्राचा मृत्यू सर्प दंशाने झाल्याने सर्पमित्रामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील करंज पाडा येथील दत्तात्रेय नामदेव विशे (२५) परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून परिचित होता. गावपरिसरात कोठेही घरात सर्प आढळल्यास नागरिक त्याला बोलावून घेत.

गेल्या दहा वर्षांत हजारो अनेक जातींचे साप पकडून त्याने जंगलात सोडून दिले तर कधी कधी तो पकडलेल्या सापांशी आपल्या घरातील खोलीत खेळत असे. अनेक सापांचा राबता त्याच्या घरातही असे त्याच्या दोन वेळा विषारी सापही चावले. मात्र त्या चावण्याचा कोणताच वाईट परिणाम त्याच्यावर झाला नव्हता त्यामुळे याही वेळी या सापाच्या चावण्या कडे त्याने पथम दुर्लक्ष केल्याचे नातेवाईक सांगतात. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याने मण्यार नावाचा साप पकडून त्याच्याशी तो दिवसभर खेळला तद्नंतर त्याने तो साप एक प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवला दुसऱ्या दिवशी मात्र त्याने तो डबा उघडताच हा साप त्याच्या चावला. थोड्या वेळाने त्याला चक्कर आल्याने त्याने खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने उपजिल्ह्या रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यात आले मात्र त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यू ने सर्पमित्रामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना साप पकडताना मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत