सर्वोच्य न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा क्रांती मोर्च्याचे कर्जत मध्ये आंदोलन

कर्जत (रायगड) : अजय गायकवाड सह भूषण प्रधान (प्रतिनिधी)

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती आणि सकळ मराठा मोर्चातर्फे कर्जत तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आज कर्जत तालुक्यातील सुद्धा मराठा समजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, जोपर्यंत स्थगिती उठविली जात नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठलीही सरकारी भरती होऊ देणार नाही, तसेच अनेक मागण्या आमच्या असल्याचे मराठा क्रांती मोर्चा कडून सांगण्यात आले असून या बाबत कर्जत तहसिल कार्यालयाचे नायब तहीशीलदार संजय भालेराव यांच्या कडे हे निवेदन देण्यात आले आहे.

मराठा समाजाचे आजचे आंदोलन शांततेत पार पडले, पण आरक्षण मिळाले नाही, तर समाजाचा उद्रेक होईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असे ही मराठा समाजाकडून स्पष्ट करण्यात आले.

या वेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते, नेते मंडळी यांसह मोठ्या संख्येने तालुक्यातील मराठा समाज उपस्थित होते. यात महिलांनी देखील उपस्थिती दाखवली होती. या वेळी कर्जत पोलीस ठाण्याकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करोनामुळे सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत