सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलचे भाव घसरले

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for petrol diesel

सलग दोन महिने दरवाढ झाल्यानंतर पेट्रोलच्या भावांमध्ये आता मोठ्या प्रमाणात घट होते आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलचे भाव ४० पैशांनी घसरल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर घसरून ७५.२५ पैसे झाले आहेत तर डिझेलचे भाव ७० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. मुंबईतही पेट्रोलचे भाव घसरून ८१.१० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. कोलकात्यातही भाव ३१ पैशांनी घसरले आहे. भारतात सर्वत्र भाव ७५ ते ८३ रुपयांमध्ये मिळत आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या भावांमध्ये लक्षणीय घट होत असून त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या भावांवर होतो आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाने नीच्चांकी आकडा गाठला आहे. अमेरिका,रशियाने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवल्यामुळे बाजारातील कच्च्या तेलाची आवकही वाढली आहे. डिसेंबर ६ला यासंदर्भात ओपेकची मीटिंग होणार आहे. ओपेकच्या बैठकीमध्ये कच्च्या तेलाच्या भावांबद्दल निश्चिती करण्यात येणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत