बुधवार, 1 डिसेंबर 2021

Follow Us

Follow Us

सलमानचा मेहुणा आयुष शर्माला बडोद्यातील प्रमोशन पडले महाग! पोलिसांनी वसूल केला दंड!!

‘लवरात्रि’ या चित्रपटाचे आयुषने जोरदार प्रमोशन चालवले आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटसाठी आयुष व त्याची या चित्रपटाची हिरोईन वरीना हुसैन हे दोघेही गुजरातेत बडोद्याला पोहोचले.

रायगड माझा ऑनलाईन | बडोदा

Salman Khan Brother In Law Ayush Sharma Not Wearing Helmet | सलमानचा मेहुणा आयुष शर्माला बडोद्यातील प्रमोशन पडले महाग! पोलिसांनी वसूल केला दंड!!
सलमानचा मेहुणा आयुष शर्माला बडोद्यातील प्रमोशन पडले महाग! पोलिसांनी वसूल केला दंड!!

                 सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरचं बॉलिवूड डेब्यू करतोय. ‘लवरात्रि’ या चित्रपटातून तो डेब्यू करतोय. साहजिकचं, या चित्रपटाचे आयुषने जोरदार प्रमोशन चालवले आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटसाठी आयुष व त्याची या चित्रपटाची हिरोईन वरीना हुसैन हे दोघेही गुजरातेत बडोद्याला पोहोचले. पण बडोद्यातील प्रमोशन आयुष व वरीनाला चांगलेच महाग पडले. होय, दिवसभर आयुष व वरीनाने बडोद्याच्या रस्त्यावर या चित्रपटाचे प्रमोशन केले आणि रात्री पोलिस त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचले.


आता हे सगळे काय प्रकरण आहे, हे तुम्हाला कळायलाचं हवे. तर त्याचे झाले असे की, बडोद्यात आयुषने विना हेल्मेट दुचाकी चालवत ‘लवरात्रि’चे प्रमोशन केले. त्यांचे हे प्रमोशन चांगलेच हिट झाले. लोकांनी आयुष व वरीनाला पाहायला रस्त्यांवर चांगलीच गर्दी केली. पण या प्रमोशनचे फोटो व्हायरल होताचं, बडोद्याचे कर्तव्यतत्पर वाहतूक पोलिस चालान घेऊन रात्री आयुषच्या हॉटेलवर पोहोचले. विनाहेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल पोलिसांनी दोघांचेही चालान फाडले आणि दंडाची रक्कमही वसूल केली.
असिस्टंड कमिशनर आॅफ पोलिस (ट्रॅफिक) अमिता वनानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे लोक सेलिब्रिटी आहेत आणि त्यांनी आपली जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांचे पालन करायला हवे. आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये पाठवून चालान फाडायला सांगितले, असे त्यांनी सांगितले.

गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. वरीना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच  अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा आहे. अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत