सलमानच्या ‘भारत’मध्ये कतरिनाची एन्ट्री!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अभिनेत्री प्रियंका चोप्राने सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाला रामराम ठोकला. त्यानंतर सलमानची लाडकी अभिनेत्री त्याच्या मदतीला धावून आली आहे. कतरिना कैफ आता ही भूमिका साकारणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून कतरिना ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. खुद्द सलमाननेच फेसबुक, ट्विटरवरुन ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आतापर्यंत मैने प्यार क्यों किया, पार्टनरपासून एक था टायगर आणि टायगर जिंदा है सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि कतरिना यांनी एकत्र काम केलं आहे. दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते कायमच आतुर असतात. त्यामुळे ‘भारत’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा ही संधी मिळणार आहे.

कतरिना आणि सलमानसोबत काम करण्यास मी प्रचंड उत्सुक असल्याच्या भावना दिग्दर्शक अली अब्बास जफरने व्यक्त केल्या आहेत.लग्नासाठीच प्रियंका चोप्राने अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपट सोडल्याचं म्हटलं जातं. दिग्दर्शक अली आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना प्रियंकाविषयी कुठलीही अढी नाही. मात्र रील लाईफ प्रॉडक्शन्सचे सीईओ निखिल नमित प्रियंकावर नाराज असल्याचं दिसत आहे. अचानक असा निर्णय घेण्याचं प्रियंकाचं वर्तन अत्यंत अनप्रोफेशनल असल्याचं ते म्हणाले.

16 सप्टेंबर रोजी निक 26 वर्षांचा होत आहे. याच मुहूर्तावर प्रियंका आणि निक लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अवघा दीड महिना उरल्यामुळे प्रियंकाच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.सलमान खानसोबत या चित्रपटात तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही झळकणार आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमधील शूटिंग सुरु झालं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत