सलमानच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलले

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन ।

अभिनेता सलमान खान याच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट लव्हरात्री घोषणेच्या पहिल्याच दिवसांपासून चर्चेत आहे. पण याचे कारण सलमानची लाडकी बहिण अर्पिताचा नवरा आयुष्य शर्मा नाही. तर या चित्रपटाचे बदललेले नाव आहे. जे मागच्या काही दिवसांत वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

चित्रपटाचा ट्रेलर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची कथा देखील या सणाच्या भोवताली फिरते. चित्रपटाचे ‘लव्हरात्री’ असे नाव ठेवण्यात आले होते. मात्र, काही धार्मिक संघटनांच्या विरोधानंतर ते बदलून आता ‘लव्हयात्री’ असे करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या बदलत्या नावाचे पोस्टर ट्विट करत, ‘ही कोणतीही स्पेलिंग मिस्टेक नाही. चित्रपटाचे नाव बदलून ‘लव्हयात्री’ असे ठेवण्यात आले आहे, असं सलमानने स्पष्ट केलं. विश्व हिंदू परिषदेने आणि काही अन्य संघटनांनी हे नाव बदलण्याची मागणी केली होती. तसंच हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी सलमान आणि चित्रपटाशी संबंधित व्यक्तींवर मुझफ्फरपूर कोर्टाने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे हे नाव बदलण्यात आलं.

या चित्रपटात आयुष शर्मा सोबत वरीना हुसैन बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हे गुजरातमध्ये झाले आहे. या चित्रपटातून कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोचवण्याचा आपला उद्देश नसल्याचं सांगत आपण हे नाव बदललं, असं सलमानने म्हटलंय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत