सलमाननं चित्रपटातून हटवलं आतिफ असलमचं गाणं

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

पुलवामा हल्ल्याचा बॉलिवूडकर वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ अभिनेता सलमान खान याने आपल्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटातून पाकिस्तानी गायक आतिफ असलमचे गाणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय अनेक भारतीय निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतला. त्यामुळे, सलमाननेदेखील आतिफनं गायलेलं गाणं चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,’सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटात आतिफ असलमनं एक गाणं गायलं होतं. परंतु, सलमाननं हे गाणं हटवण्याच्या सूचना प्रोडक्शन हाऊसला दिल्या आहेत. आता हे गाणं पुन्हा एकदा नव्यानं रेकॉर्ड केलं जाणार आहे.’

‘नोटबुक’ चित्रपटातून मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन आणि जहीर इकबाल यांना सलमान लाँच करत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत