सलमान खानवर पत्रकाराला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

मुंबई : रायगड माझा वृत्त

अभिनेता सलमान खान याने पत्रकाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.सलमान खान डी एन नगर परिसरात सायकल चालवत होता त्यावेळी एक व्यक्ती त्याचा पाठलाग करत व्हिडिओ बनवत होता. त्याचा सलमानला राग आल्यामुळे सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला व शिवीगाळ केली.या प्रकरणी सलमान खान व  त्याचा बॉडीगार्ड शेरा विरोधात मंगळवारी रात्री उशीरा महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अंधेरीच्या न्यायालयात अशोक पांडे यांनी सलमान खान विरोधात तक्रार केली आहे.यामध्ये त्यांनी  प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.पांड्ये यांचे वकील नीरज गुप्ता आणि निशा आरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आणि बॉडीगार्ड शेराविरोधात भा. दं. वि. ३२३, ३९२, ४२६, ५०६ आणि ३४ या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.१२ जुलै रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत