सह्याद्रीतल्या किल्ल्यांची परदेशी मावळ्याला भुरळ

मुंबई: महाराष्ट्र News 24

सह्याद्रीतल्या किल्ल्यांची परदेशी मावळ्याला भुरळ पडली आहे. बेल्जियमचा नागरिक असलेल्या पीटर व्हॅन गेट यानं गेल्या दोन महिन्यात राज्यातल्या २०० किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. त्यांच्या या किल्ले भ्रमंतीची सोशल मीडियावर देखील बरिच चर्चा होत असून नेटकऱ्यांकडून त्यांचं कौतुकही होत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला जागतिक पातळीवर जी ओळख प्राप्त झाली आहे, ती इथल्या किल्ल्यांमुळंच! त्यामुळंच एका परदेशी मावळ्याला देखील या किल्ल्याची भुरळ पडली आहे.

पीटर व्हॅन गेट हे मूळचे बेल्जियमचे असून कामानिमित्तानं गेले काही वर्षै ते चेन्नईत राहत आहेत. त्यांना भटकंतीची प्रचंड आवड असून भारतातील अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. प्रत्येक उन्हाळ्यात ते हिमालयात ट्रेक करायला जातात. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांबद्दल त्यांच्या मनात कुतुहल होतं. त्यामुळं या हिवाळ्यात त्यांनी सह्याद्रीची सैर करण्याचं ठरवलं. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची भ्रमंती करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तब्बल २०० किल्ल्यांना भेटी दिल्या. केवळ ट्रेकींग नव्हे तर किल्ल्यांचा इतिहास ते समजून घेत आहेत. छत्रपती शिवरायांचा पराक्रम, किल्ल्यांचं बांधकाम याबद्दल ते माहिती समजून घेत आहेत.

पीटर हे इंजिनीअर असून दोन वर्षापूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. चेन्नईत कामानिमित्त आलेल्या पीटर यांना भारतातील डोंगर रांगां खुनावत होत्या. त्यांनी इथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हिमालयाची भ्रमंती झाल्यानंतर त्यांना सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल समजलं. त्यानंतर त्यांच्या मनात महाराजांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कुतुहल निर्माण झालं. मग काय एक बॅगपॅक आणि कॅमेरा घेऊन ते निघाले आणि किल्ले भ्रमंती सुरू झाली.

पीटर हे एका दिवसामध्ये १०० किलोमिटरपर्यंतही धावू शकतात असं त्यांनी सांगतिलं. त्यामुळं गड किंवा चढणं त्यांना फार अवघड वाटलं नाही. भंडारदरा भागातील किल्ले त्यांना जास्त निसर्गरम्य वाटले.किल्ल्यांना भेटी देताना स्थानिकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल आदर पाहून आश्चर्य आणि कौतुक वाटलं तसंच प्रत्येक ठिकाणी त्यांचं मानानं आदरातिथ्य करण्यात आलं असंही ते सांगतात.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत