सांगवी :रायगड माझा
महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या वतीने प्रभाग क्रमांक 31 व 32 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 34 हजार चौरस फुट जागेतील बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये नवी सांगवीतील दोन हजार चौरस फुट, जुनी सांगवीतील 900 चौरस फुटाचे बांधकाम तर पिंपळे गुरव येथील 500 चौरस फुट जागेतील पत्राशेड भुईसपाट करण्यात आले.
कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत उपअभियंता नितीन निंबाळकर यांच्यासह दोन कनिष्ठ अभियंता, 8 बीट निरीक्षक, 1 उपनिरीक्षक, 10 महापालिका पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. एक जेसीबी, एक गॅस कटर तसेच दहा मजुरांची मदत घेण्यात आली.
शेयर करा