सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नेरळ : रायगड माझा वृत्त 

सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात नेरळ पूर्व भागातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या बस स्थानकाजवळील लक्ष्मी अपार्टमेंटच्या चेंबरमधून काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी पसरली असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नेरळ पूर्व भाग हा अनेक खेडे गावांना जोडल्या गेल्याने येथे बस स्थानक आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ सुरू असते. मात्र या नागरिकांना येथील लक्ष्मी
अपार्टमेंटच्या चेंबर मधून वाहणाऱ्या सांडपाण्याचा त्रास उद्भवत आहे. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्याला लागूनच प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा असल्याने येथील आरोग्य सेवा देखील धोक्यात आली आहे. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या या रस्त्यावरून या ग्रामपंचायतीचे  सरपंच,ग्रामसेवक,आणि सदस्य येथूनच ये जा करतात. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. वारंवार तक्रारी देवूनही या सांडपाण्याचा योग्य तो निचरा होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यवाही करत नसल्याचा आरोप नागरिक व्यक्त करीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत