साईनाचा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दारूण पराभव

नानचिंग : रायगड माझा वृत्त 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील साईनाचे आव्हान आज संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिकमधील सुर्वण पदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनने साईनाला उपांत्यपूर्व फेरीत 21-6, 21-11 असा पराभवाचा धक्का दिला.

पहिल्या गेमच्या सुरुवातीपासूनच कॅरोलिनाने साईनावर वर्चस्व गाजवले. सुरुवातीलाच 11-2 अशी भक्कम आघाडी घेत तिने साईनावर दडपण आणले. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या साईनाला प्रत्युत्तर देण्याची एकही संधी कॅरोलिनाने दिली नाही. यामुळे साईनाने 12व्या मिनिटाला पहिला गेम 6-21 अशा मोठ्या फरकाने गमावला.

दुसऱ्या गेममध्ये साईनाने प्रथम गुणांचे खाते उघडले मात्र कॅरोलिनासमोर ती निष्र्पभ ठरली. कॅरोलिनाच्या आक्रमक खेळामुळे दडपण आलेल्या साईनाला सामन्याची लय शेवटपर्यंत सापडलीच नाही. गेमच्या 19 व्या मिनिटाला जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या कॅरोलिनाने साईनावर 21-11 अशा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

”मला मातब्बर प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त सामने खेळण्याची गरज आहे. सुपर सिरिजमध्ये मी चांगली कामगिरी करु शकत नसल्याने मला यांच्याविरुद्ध खेळण्याचा अनुभवच मिळत नाही. मला या खेळाडूंचा सामना करण्याची सवय करुन घेणे गरजेचे आहे.”
– साईना नेहवाल

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत