साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई:रायगड माझा

शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत भाजपचा अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली.

राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने याविषयीचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे हावरे यांना शासकीय समारंभात मानाचे स्थान, समितीच्या मुख्यालयात कार्यालय तसेच मासिक मानधनासह विविध भत्ते मिळणार आहेत. हावरे हे उद्योगपती असून त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत. शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत