साउथ एशियाई  चैंपिनशिपसाठी कर्जतच्या खेळाडूंची निवड. कर्जतच्या खेळाडूंचा राजस्तरीय स्पर्धेत डंका…

भूषण प्रधान – कर्जत 

 

राज्य स्तरीय टायक्वोंडो  स्पर्धेमध्ये कर्जतच्या खेळाडूंनी बाजू पटकाविला असून प्रथम क्रमांक आला आहे. गोवा दामोदर नाईक हॉल,नेहरू स्टेडियम येथे ८ ते १० ऑक्टोबर रोजी चौथ्या राज्यस्तरीय स्पर्धा २०२१  झालेल्या फिट इंडिया व खेलो इंडियाच्या विद्यामानाने खेळवण्यात आली.या स्पर्धेत भारतातील २१ राज्यानी सहभाग घेतला..मेजर जनरल दिलावर सिंह चीफ गेस्ट,आमदार रवि नाइक, रणवीर सिंघजी सी आय डी इंस्पेक्टर, अर्पण सिंघजी जनरल सेक्रेटरी साउथ एशियाई फेडरेशन फ़ॉर ऑल स्पोर्ट्स हे मान्यवर उपस्थित होते.

टायक्वोंडो या खेळ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून कर्जत रायगडच्या मास्टर सौरभ सुनील नवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या स्पर्धेमधून वेदांत नितिन बोरडे २१ वर्षाखालील वयोगटात सुवर्ण पदक, साहिल अजय सिंह (वय  १७ ) वयोगटात सुवर्ण पदक,स्वराज अविनाश जाधव वयवर्ष ५ सुवर्ण पदक तसेच महाराष्ट्राचा सर्वात लहान गोल्ड मेडलिस्ट म्हणून स्वराज ने ओळख निर्माण केली आहे ,मास्टर सौरभ सुनील नवले यांनी सीनियर मास्टर कॅटेगरी सुवर्ण पदक पटकावले .
यांची साउथ एशियाई चैम्पिनशिप साठी निवड झाली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत