बेल्हे : रायगड माझा
पोलिसांनी बेल्हे, साकोरी येथ महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यावर छापा घालून अकरा जणांवर कारवाई केली; पण पोलीस माघारी फिरताच ते जोमाने सुरू झाले आहेत.
बेल्हे गावच्या टेभी मळा शिवारात पिंपळगाव जोगा कालव्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच साकोरी येथील हायस्कूलच्या मागे असलेल्या जुगारीच्या अड्ड्यावर छापा घालून माल हस्तगत केला. बेल्ह्यात एका जुगारीच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात तीन जणांवर, साकोरी येथे, जुगारीच्या अड्ड्यावर छापा टाकून अकरा जणांवर गुन्हा दाखल केला. तद्नंतर आळेफाटा पोलिसांनी नाशिक रस्त्यावर एका नामांकित रुग्णालयासमोर पत्र्याच्या गजाननाच्या खोलीत सुरू असलेल्या मटका धंद्यावरील खेळीनी पळ काढला. हे दोन्ही छापे टाकण्याचे धाडस पोलिसांनी दाखविले हे महत्त्वाचे मानले जाते.
जुन्नर तालुक्यात तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांनी सर्वच पोलीस ठाण्याच्या पोलिसांना हद्दीतील मटका, जुगार अड्डे सुरू असल्यास, संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल, असा फतवा काढला होता; पण येथील जुगार, मटका व्यावसायिकानीं धंदे बंद केले नाहीत.
साकोरी येथे मटका, बेल्ह्यात जुगारीच्या तर आळेफाटा येथे मटका धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी जुजबी कारवाई केल्याची भावना झाल्याने, पोलीस अधिकाऱ्यांना धंदे बंद केल्याचे व्यावसायिक भासवत असल्याचे छाप्यावरून स्पष्ट झाले आहे. हे धंदे आळेफाटा परिसरातील व्यावसायिकांनी सकाळी सुरू ठेवून दुपारी बंद ठेवण्याचा फंडा वापरला. तो फंडा पोलिसांच्या छाप्यामुळे उघडकीस आला होता; पण आज साकोरी, बेल्हे, आणे, राजुरी शिवारात जुगार, मटक्याचे धंदे जोमाने सुरू आहेत.