साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंवर ईडीची मोठी कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

ED attaches 255 crore assets of firms linked to Ratnakar Gutte sgy 87 | साखरसम्राट  रत्नाकर गुट्टेंवर ईडीची मोठी कारवाई, २५५ कोटींची मालमत्ता जप्त | Loksatta

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या संबंधी माहिती दिली आहे.

ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. ईडीने गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर कारवाई केली आहे. शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीची आहे. ते कंपनीचे संचालकही आहेत. रत्नाकर गुट्टे इतरांच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत